कोकणातली निसर्ग सौदर्य स्पर्धा
महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे विस्तीर्ण पसरलेला समुद्र किनारा तर दुसरीकडे न संपणारे उंचच उंच पर्वत रांगा. हे आहे कोकण . अतिशय रम्य असे नेत्रासुखकारक सौंदर्य कोकणच्या वातावरणातील कणाकणात सामावलेले आहे . तिन्ही ऋतू भरभरून निसर्ग कोकणाला बहाल करतात. पावसाळा तर निसर्गाचे असंख्य चमत्कार घेऊनच येतो. अगणित जीवसृष्टी येथे वास करते .
कोकणी लोकांची कौलारू घरे |
हिरवेगार डोंगर आणि दऱ्या
निसर्गाची लयलूट पाहायला मिळते अगदी मनसोक्त. डोळ्यांचे पारडे फिटते . सगळी दुख:, चिंता माणूस विसरून जातो. आणि फक्त या नजराण्यात स्वताला विसरून जातो. निसर्गाच्या या लीला पहाताना माणूस म्हणून आपण किती छोटे आहोत हे कळत .
पारंपारिक पद्धतीने केली जाणारी भात शेती .
नवनवे तंत्रज्ञान तितकेसे शोधलेच जात नाही . अतिशय कष्टमय जीवन असते येथील लोकांचे .
हा समुद्रकिनारा म्हणजे जणू सुरक्षाभिंत आहे .
|