शेती आणि सुधारणा
पावसाची अनिश्चितता आणि भौगोलिक स्थिती यामुळे कोकणातील शेती करणे अतिशय कठीण जाते डोंगर दऱ्या, सपाट प्रदेशांचा अभाव . त्यामुळे आधुनिक शेतीच्या पद्धती . आधुनिक शेतीची अवजारे यांचा अभाव आढळतो .
त्यातच शासनाची अनास्था आणी गावकऱ्यांची मनोवृत्ती कोकणच्या प्रगतीतले अडथळे आहेत .
अजूनही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते.
भात सुद्धा वर्षभर पुरेल एवढाच पिकवला जातो . अवकाळी पाउस पडला तर सर्व पिक नष्ट होते.
वर्षभर कोकणातला शेतकरी काबाड कष्ट करत असतो .
पावसाळ्यासाठी शेणाच्या गोवऱ्या थापून वळवून ठेवल्या जातात . पावसाळ्यात मग मुसळधार पावसात घराघरातून-कौलातून धूर येताना दिसतो तो या वाळवलेल्या शेणी मुळे चूल पेटवणे सुलभ झालेले असते .
कोकणातला पावसाळा म्हणजे एक अप्रतिम सोहळा आहे .
भातशेती हे शक्यतो एकच पिक जास्त प्रमाणात घेतले जाते . पण मेहनत कष्ट भरपूर आणि उत्पन्न मात्र थोडे असा काहींसा प्रकार येथे असतो म्हणून मग इतर उपजीविकेचे मार्ग लोक शोधतात . जसे कि मासेमारी ,इत्यादी .
अलीकडे आंबा-काजूचा व्यवसाय जोर धरू लागला आहे .