कोकणातील फळफळावळ
डोंगराच्या कुशीतून उगवणारा सूर्य |
ऐटीत आरावणारा कोंबडा |
भुंगे , बारीक बारीक कीटक मोहोरलेल्या आंब्याभोवती
पिंगा घालताना दिसू लगतात . मोहोरलेल्या आंबा
पाहणे. रोज रोज त्या तूऱ्यामधून डोकावणारे
मोहोराने ओथंब लेले आंब्याचे झाड |
जगभर आपल्या अप्रतिम चवीसाठी प्रसिद्ध असा हापूस आंबा कोकणच्या प्रत्येक प्रांतात मुबलक प्रमाणात
पिकतो .
थोड्याच दिवसांत मोठमोठाले आंबे झाडावर
ठसठसून दिसू लागतात .
उच्च प्रतीचा एक हापूस आंबा जवळजवळ
एक किलोच्या आसपास वजनाचा असतो .
पिकलेल्या आंब्यांचा घमघमाट सगळीकडे पसरतो . एक आंबा खाल्ला कि जिभेची चव चाळवली जाते .
पिवळा धम्मक आंबा |
जस जसे उन्हे तापू लागतात तसतसे पिवळ्या पिवळ्या आंब्याचे घड लोंबकळू लागतात .
आणि मग आंब्यांचे घड अलगद उतरवले जातात .
पहिले पिकलेले आंब्याचे फळ जाते ते देवघरातील
देवापुढे.
No comments:
Post a Comment