Sunday, 6 December 2015







हा निसर्गरम्य सुर्यास्त पाहायला कोकणची किनारपट्टी गाठावी लागेल. 





हा सूर्य अस्ताला जातानाही आपली किरण शीतल करून सोनेरी किरणांच्या प्रकाशाचा  झोत पृथ्वीवर पसरून जातो.   समुद्र सोनेरी होऊन जातो सगळी सृष्टी सोनेरी रंगात न्हावून निघते . 







समुद्राचे पाणी सोनेरी . सगळी सृष्टी सोनेरी  असे  लोभसवाणे नजारे प्रत्येकाने आयुष्यात एकदातरी अनुभवावे 



निसर्गापुढे आपण किती छोटे आहोत याचा साक्षात्कार होतो आयुष्यात असे क्षण अनुभवणारा व्यक्ती मग खऱ्या  अर्थाने  विजयी होतो . 



प्रत्येक पक्षी ,
त्यांचे स्वभाव वेगळे . पण बगळ्यांचे थोड वेगळ असत बहुतेक . ते आकाशात किती 
शिस्तबद्धतेने  उडतात  अगदी एका रांगेत . हे बगळे खूप लांबचा प्रवास कितीतरी वेळ कुठेही न थांबता करतात. उद्याचा दिवस आजसारखा नक्कीच नसेल . पण सूर्यास्ताने त्यांना सागितले कि आजचा दिवस संपला आहे . घरट्यात जाऊन आराम करायची वेळ झाली आहे . 









हे माडाचे झाड जरा जास्तच खाली झुकलेले वाटते . मावळत्या सूर्याला मानवंदना दिली जाते आहे वाटते . आजच्या  दिवसासाठी आभार  हे सूर्यदेवा . 








माझ्या कोकणातील समुद्रकिनाऱ्याचे वैशिष्ट  अप्रतिम आहे . जागतीकरणाच्या लाटेत , मानवी हव्यासापोटी हे सौदर्य  लोप तर पावणार नाही ना . 














No comments:

Post a Comment