कोकण गणपतीपुळ्याचा गणपती शिवाय अपूर्ण आहे ,
कोकणच आराध्यदैवत गणपती . कोकणातील माणसांच्या हृदयात सदैव गणपती देवावरची अपार श्रद्धा वास करते म्हणून असंख्य कला असलेला कोकणी माणूस नेहमी समाधानी असतो . पैशासाठी कोकणातील वैभवाचा बाजार मांडत नाही. आजच्या बाजारीकरणाच्या वातावरणातही जमिनीवर घट्ट पाय रोवून उभा आहे .
दूरपर्यंत पसरलेला अथांग समुद्र .लाटांशी पकडापकडीचा डाव खेळणारे समुद्रकिनारे .
कोकणच्या प्रत्येक प्रांतातील सौंदर्य कॅमेऱ्यात साठवून ठेवण्यापेक्षा हृदयात जास्त साठवले जाते .
शब्द कमी पडतात .
कोकणच्या प्रत्येक प्रांतातील सौंदर्य कॅमेऱ्यात साठवून ठेवण्यापेक्षा हृदयात जास्त साठवले जाते .
तांबडा , हिरवा,सफेद',आकाशी ,निळा ,गर्द निळा नजरेच्या एका टप्यात सारे रंग सामावले जातात .
सूर्य अस्ताला जाताना नेहमी उदास का वाटते? . एक अनामिक ओढ नेमकी त्या वेळी आठवते . उद्या पुन्हा सूर्य उगवणारच आहे . पण तरीही त्याचे असे अस्ताला जाणे आपली आवडती व्यक्ती कायमची सोडून गेल्याची आठवण का करून देते . त्याच्याच किरणांचा आपण एक अंश आहोत .
आपल्याला सोडून तो पुन्हा नव्याने येण्यासाठी जातो . कधी डोंगरांच्या कुशीत तर कधी समुद्राच्या पलीकडे .
No comments:
Post a Comment