कोकणातील घरे
पूर्वी कोकणात बांबुची ,गवताची, कुडाची घरे असत. चारही भिंती बांबू गवत आणि त्याच्यावर शेणाचा लेप थापून भिंती जाडजूड करायच्या त्यामुळे कितीही वारा पाउस आला तरी तग धरून राहायच्या .
जमीन खणून नंतर पाणी टाकून सारखी करावी लागायची नंतर दोन -तीन दिवस चांगली चोपण्याने चोपून चोपून घट्ट करत शेवटी शेणाने सरावायची . एवढे सोपस्कार करावे लागायचे .
पुढे पुढे लोकांनी प्रगती केली . चाकरमान्यांच्या हातात जस जसा पैसा आला तसा त्याच्या आवडत्या कोकणातील घराचे रूपही पालटत गेले .
.
कौलारू घराचा थाट काही औरच असतो . पुढची ओटी, मागची ओटी, स्वयपाकाची खोली, धान्य ठेवायच्या खोल्या,परसातली खोली, माजघर, माळा - पोटमाळा , ऐसपैस अंगण -अंगणात तसाच भव्य चीव्यांचा (बांबूंचा) मांडव. ऐसपैस घरांच्या खोल्या असतात. घरातील रोजचा केर काढायचा म्हणजे अर्धा-एक तास गेलाच म्हणून समजा . हे कौलारू घर म्हणजे मोठाला वाडा असायचा .
काळाबरोबर घरेही बदलली . लोकसंख्या वाढली . तशी घरांची संख्यापण वाढली . घरांच्या वस्त्या झाल्या .
पण कोकणच्या वैभवात कुठेही कमी झाली नाही.
गर्द वनराईत लपलेली घरे फक्त घराची कौल तेवढीच दिसतात कारण चाहु बाजूनी अंगणात फुलझाडे , आंबा-फणस, चिकू, सीताफळ ,रामफळ ,नारळ यांनी घर पूर्ण वेढलेली असतात .
आतातर गावातील लोकांमध्ये स्पर्धा असते . कोणाचा बंगला जास्त सुंदर आहे . मग चिरेबंदी घरेही सिमेंट वाळू-विटांनी बांधली गेली . गुळगुळीत मुलामा चढवून रंगीबेरंगी झाली .
पण या सर्वांनी कोकणच्या सौदर्यात भरच घातली . कोकणाचा श्रीमंती थाट
दिवसेंदिवस वाढत आहे .
कोकणाचे काळाबरोबर बदलत चाललेले रूपही हवेहवेसे वाटते .
No comments:
Post a Comment