Thursday, 10 December 2015

FARMING IS NOT SO EASY IN KOKAN

शेती आणि  सुधारणा 


RICE FIELD IMAGES IN KOKAN साठी प्रतिमा परिणाम

RICE FIELD IMAGES IN KOKAN साठी प्रतिमा परिणाम




पावसाची अनिश्चितता   आणि  भौगोलिक स्थिती  यामुळे कोकणातील शेती करणे अतिशय कठीण जाते डोंगर दऱ्या, सपाट प्रदेशांचा अभाव . त्यामुळे आधुनिक शेतीच्या पद्धती . आधुनिक शेतीची अवजारे यांचा अभाव आढळतो . 

RICE FIELD IMAGES IN KOKAN साठी प्रतिमा परिणाम

त्यातच  शासनाची अनास्था  आणी गावकऱ्यांची मनोवृत्ती  कोकणच्या प्रगतीतले अडथळे आहेत . 
अजूनही पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. 


भात सुद्धा वर्षभर पुरेल एवढाच  पिकवला जातो . अवकाळी पाउस पडला तर सर्व  पिक नष्ट होते.   

वर्षभर कोकणातला शेतकरी काबाड  कष्ट करत असतो .
पावसाळ्यासाठी शेणाच्या गोवऱ्या थापून वळवून ठेवल्या जातात . पावसाळ्यात मग मुसळधार पावसात घराघरातून-कौलातून   धूर येताना  दिसतो तो या वाळवलेल्या शेणी मुळे चूल पेटवणे सुलभ झालेले असते . 



कोकणातला पावसाळा म्हणजे एक अप्रतिम सोहळा आहे . 

भातशेती हे शक्यतो एकच  पिक जास्त प्रमाणात घेतले जाते . पण मेहनत कष्ट भरपूर आणि उत्पन्न मात्र थोडे असा काहींसा प्रकार येथे असतो म्हणून मग इतर उपजीविकेचे मार्ग लोक शोधतात . जसे कि मासेमारी ,इत्यादी . 





अलीकडे आंबा-काजूचा व्यवसाय जोर धरू लागला आहे . 

















Wednesday, 9 December 2015

HOUSES IN KOKAN

कोकणातील घरे 







houses in kokan साठी प्रतिमा परिणाम


पूर्वी  कोकणात  बांबुची ,गवताची, कुडाची  घरे असत.  चारही भिंती बांबू गवत  आणि त्याच्यावर शेणाचा लेप थापून भिंती जाडजूड करायच्या त्यामुळे कितीही वारा पाउस आला तरी तग धरून राहायच्या . 
जमीन खणून नंतर पाणी टाकून सारखी करावी लागायची नंतर  दोन -तीन दिवस  चांगली चोपण्याने  चोपून चोपून घट्ट करत शेवटी शेणाने सरावायची . एवढे  सोपस्कार करावे लागायचे . 



HUTS IMAGES साठी प्रतिमा परिणामHUTS IMAGES साठी प्रतिमा परिणाम

पुढे पुढे लोकांनी प्रगती केली . चाकरमान्यांच्या हातात जस जसा पैसा आला तसा त्याच्या आवडत्या कोकणातील घराचे रूपही पालटत  गेले . 


houses in kokan साठी प्रतिमा परिणाम


.
कौलारू घराचा थाट  काही औरच असतो . पुढची ओटी, मागची ओटी, स्वयपाकाची खोली, धान्य ठेवायच्या खोल्या,परसातली खोली, माजघर, माळा - पोटमाळा , ऐसपैस अंगण -अंगणात तसाच भव्य चीव्यांचा (बांबूंचा) मांडव. ऐसपैस  घरांच्या खोल्या असतात.  घरातील रोजचा केर काढायचा म्हणजे अर्धा-एक तास गेलाच म्हणून समजा .  हे  कौलारू घर म्हणजे  मोठाला वाडा  असायचा . 

काळाबरोबर  घरेही बदलली . लोकसंख्या वाढली . तशी घरांची संख्यापण वाढली . घरांच्या वस्त्या झाल्या . 
पण कोकणच्या वैभवात कुठेही कमी झाली नाही. 

houses in kokan साठी प्रतिमा परिणाम





गर्द वनराईत  लपलेली घरे फक्त घराची कौल तेवढीच दिसतात कारण चाहु बाजूनी अंगणात फुलझाडे , आंबा-फणस, चिकू, सीताफळ ,रामफळ ,नारळ  यांनी घर पूर्ण वेढलेली असतात . 


houses in kokan साठी प्रतिमा परिणाम




आतातर गावातील लोकांमध्ये स्पर्धा असते . कोणाचा बंगला जास्त सुंदर आहे . मग  चिरेबंदी घरेही सिमेंट वाळू-विटांनी बांधली गेली . गुळगुळीत मुलामा चढवून रंगीबेरंगी झाली .



houses in kokan साठी प्रतिमा परिणाम


पण या सर्वांनी कोकणच्या सौदर्यात भरच घातली . कोकणाचा श्रीमंती थाट 
दिवसेंदिवस वाढत  आहे . 

houses in kokan साठी प्रतिमा परिणाम




कोकणाचे काळाबरोबर बदलत चाललेले रूपही हवेहवेसे वाटते . 



houses in kokan साठी प्रतिमा परिणाम








Sunday, 6 December 2015

KOKAN-FRUIT TREASURY

कोकणातील फळफळावळ 





डोंगराच्या कुशीतून उगवणारा सूर्य 
          
सूर्याचे आगमन झाले  आहे .  सूर्याने तर सोनेरी किरणाचा वर्षाव सुरु केला आहे . डोंगर , नदी नाले, झाडे झुडपे, वेली ,पशु-पक्षी  सगळे उठले आपआपल्या कामाला लागले. कोण कोण उठला आहे बर .  कोंबड्याने तर केव्हाच आरोळी ठोकली आहे .

ऐटीत आरावणारा  कोंबडा 












भुंगे , बारीक बारीक कीटक मोहोरलेल्या आंब्याभोवती 
पिंगा घालताना  दिसू लगतात . मोहोरलेल्या आंबा  
पाहणे. रोज रोज त्या तूऱ्यामधून डोकावणारे
                                                                    
मोहोराने ओथंब लेले आंब्याचे झाड 
 छोटे - छोटे आंबे-कैऱ्या पाहणे खूपच आनंद देते.

जगभर आपल्या  अप्रतिम चवीसाठी प्रसिद्ध  असा हापूस आंबा   कोकणच्या प्रत्येक प्रांतात मुबलक प्रमाणात 
पिकतो .

थोड्याच दिवसांत  मोठमोठाले आंबे झाडावर 

ठसठसून दिसू लागतात .



उच्च प्रतीचा एक हापूस आंबा जवळजवळ 
एक किलोच्या आसपास वजनाचा  असतो .


पिकलेल्या आंब्यांचा घमघमाट  सगळीकडे पसरतो . एक आंबा खाल्ला कि  जिभेची चव चाळवली  जाते . 


पिवळा धम्मक आंबा 

जस जसे  उन्हे तापू लागतात तसतसे पिवळ्या पिवळ्या आंब्याचे घड लोंबकळू लागतात . 

आणि मग आंब्यांचे घड अलगद उतरवले जातात . 
पहिले पिकलेले आंब्याचे फळ जाते ते देवघरातील
 देवापुढे.